Friday , November 6 2026
Breaking News

काळ्या दिनानिमित्त रविवारी शहरातील वाहतुकीत बदल!

Spread the love

 

राज्योत्सव मिरवणूक संपेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर; अवजड वाहनांना प्रवेशबंदी

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी आयोजित काळ्या दिनाची मूक सायकल फेरी आणि कर्नाटक राज्योत्सवानिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी केले आहे.

दोन्ही फेऱ्यांदरम्यान शहरात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी प्रमुख मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्यांनी वळविण्यात येणार आहे. तसेच शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून राज्योत्सव मिरवणूक संपेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.

असे असतील पर्यायी मार्ग

कोल्हापूर सर्कलकडून चन्नम्मा चौकाकडे येणारी वाहतूक जिनाबकुल सर्कलजवळून वळविण्यात येणार आहे. तेथून बॉक्साइट रोड, हिंडलगा फॉरेस्ट नाका, गणेश मंदिर, अर्गन तलाव, शौर्य चौक, शरकत पार्क आणि ग्लोब थिएटर सर्कलमार्गे खानापूरच्या दिशेने वाहने वळविण्यात येतील.

मध्यवर्ती बसस्थानकाकडून खडेबाजार आणि शनिवार खूटकडे जाणाऱ्या वाहनांना जिजामाता सर्कलजवळून पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. ही वाहने व्हीआरएल लॉजिस्टिक्स आणि जुन्या पीबी रोडमार्गे खानापूर रोडकडे वळविण्यात येतील.

खानापूरच्या दिशेने जाणारी वाहने किल्ला तलावाजवळून वळवून निसर्ग धाबा, केपीटीसीएल रोड, केएलई डेंटल कॉलेज आणि केएलई इस्पितळामागील मार्गाने बॉक्साइट रोडकडे पाठविण्यात येणार आहेत.

पेट्रोल पंप परिसरातून नर्गुंदर भावे चौक, जिजामाता सर्कल, देशपांडे पिंपळकट्टा, पाटील गल्ली, स्टेशन रोड आणि कांबळे खूटकडे जाणारी वाहने गोगटे सर्कलमार्गे खानापूर रोडकडे वळविण्यात येतील.

खानापूरहून बेळगावकडे येणाऱ्या वाहनांना मिलिटरी महादेव मंदिराजवळून पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. ही वाहने असदखान दर्गा आणि गवळी गल्ली क्रॉसमार्गे शहरात प्रवेश करतील.

गोगटे सर्कलकडून येणारी वाहतूक ग्लोब थिएटरजवळून शरकत पार्क, केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन, शौर्य चौक, अर्गन तलाव आणि हिंडलगा गणेश मंदिरमार्गे हनुमाननगर डबल रोडवरून बॉक्साइट रोडकडे वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून, वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी पत्रकाद्वारे केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *