



चंदगड : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने ‘चलो बेळगाव’चा नारा देत शिनोळी फाटा, चंदगड येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.
कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमाभागातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येतो. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली या दिवशी मूक सायकल फेरी, निदर्शने आणि सभांच्या माध्यमातून सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधले जाते.
या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. शिनोळी फाटा येथे निदर्शने करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तसेच सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
या आंदोलनात सीमाभागातील नागरिक आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta