Sunday , September 20 2026
Breaking News

भंडाऱ्यात भीषण अपघात; आठ मजुरांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

ट्रॅक्सची आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक; अनेक जखमी

भंडारा : लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्स वाहनाची भीषण धडक होऊन आठ मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे घडली. मृतांमध्ये छत्तीसगडमधील मजुरांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील काही मजूर ट्रॅक्स वाहनातून नागपूरच्या दिशेने जात होते. पिंपळगाव येथील पेट्रोल पंपावरून आयशर ट्रक मुख्य रस्त्यावर येत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रॅक्सने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्स वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात ट्रॅक्समधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘भारतात मुस्लिम राहू नयेत असे मानणारा हिंदू असू शकत नाही’ : मोहन भागवत

Spread the love    न्यूयॉर्क : ‘भारतात मुस्लिम राहू नयेत, असे कोणत्याही हिंदूला वाटत असेल, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *