
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात सोमवार पेठ टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटीस सेंटर येथे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, चिटणीस सुरेन्द्र देसाई, सहचिटणीस शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी, कार्यकारिणी सदस्य विजय वाईगडे, वनिता जोशी, स्नेहलता जुवळी, विठ्ठल पोळ, उल्हास पानसे, बाळकृष्ण बिर्जे व सल्लागार संचालक प्रकाश कुडतरकर उपस्थित होते.
प्रारंभी रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी यांच्या प्रार्थनेनंतर मयत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सुरेन्द्र देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले व मागील सर्वसाधारण सभेचा वृतांत सादर केला तर के. एल. मजूकर यांनी वर्षभरात मंडळाने राबविलेल्या विविध कामाचा आढावा घेतला. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या लेखा परिक्षणाचे वाचन विनिता बाडगी यांनी केले. 2026-27 सालच्या अंदाज पत्रकाचे वाचन विजय वाईगडे यांनी केले. 2026 -27 सालासाठी लेखा परिक्षणासाठी गाडगीळ व उप्पीन कंपनीची फेरनिवड करण्यात आली.
यावेळी दोन रिक्त झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या जागेवर उल्हास पानसे व बाळकृष्ण बिर्जे याची एकमताने निवड करण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात विश्वास धुराजी यांनी सभासदांनी दिलेल्या सहकार्यामुळेच संघटनेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. यावेळी सभासदांनी अनेक सुचना केल्या. शिवराज पाटील यांनी आभार मानले केले तर सभेचे सुत्रसंचालन विठ्ठल पोळ यांनी केले. यावेळी बहुसंख्य आजीव सभासद उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta