
बेळगाव : शहापूर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास करत एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे ९५ हजार रुपये आहे.
शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत या प्रकरणाचा तपास सुरू होता. दरम्यान, १० सप्टेंबर २०२६ रोजी बेळगाव शहरातील शहापूर परिसरातील बसवेश्वर सर्कल, खासबागजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो बसवराज निंगाप्पा अणगोजी (रा. मराठा गल्ली, चिक्क मुनवळी, ता. खानापूर) असल्याचे समोर आले.
पोलिसांनी अधिक चौकशी करून तपास केला असता त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त, उपपोलीस आयुक्त (का. व सु.), उपपोलीस आयुक्त (अ. व सं.) तसेच मार्केट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा एस. सिमानी, पीएसआय होन्नाप्पा तळवार, म.पीएसआय एन. एस. बसवा तसेच जी. आर. शिरसंगी, एस. एम. गुडगोळ, अजित शिपूरे, शिवराज पच्चन्नवर, हणमंत विभूती, आनंद खोत, श्रीरंग भस्म आणि सतीश गिरी यांचा सहभाग होता.
पोलिसांच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta