Sunday , September 20 2026
Breaking News

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक; आठ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

 

त्रिशूर : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने आठ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी उशिरा रात्री हा अपघात झाला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर कैपमंगलमजवळील पनंबिक्कुन्नू येथे हा अपघात घडला. मृत झालेले सर्व विद्यार्थी तामिळनाडूतील असल्याची माहिती समोर आली आहे.

तामिळनाडूमधून केरळ दौर्‍यावर आलेल्या विद्यार्थ्यांचा हा गट प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराचे दर्शन घेऊन कोडुंगलूरच्या दिशेने जात होता. रात्री सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास पनंबिक्कुन्नू येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या कारने भरधाव वेगात पाठीमागून धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की कार थेट ट्रकच्या मागील भागाखाली घुसली. कारमधील आठही जणांचा गंभीर दुखापत आणि रक्तस्रावामुळे वाहनातच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा चक्काचूर झाल्याने गॅस कटरच्या सहाय्याने वाहनाचे भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.

मृत झालेले सर्वजण तामिळनाडूतील दिंडीगुल येथील पीएसएनए अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘भारतात मुस्लिम राहू नयेत असे मानणारा हिंदू असू शकत नाही’ : मोहन भागवत

Spread the love    न्यूयॉर्क : ‘भारतात मुस्लिम राहू नयेत, असे कोणत्याही हिंदूला वाटत असेल, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *