Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव प्रायमरी टीचर्स सोसायटीची १०३ वी वार्षिक सभा उत्साहात

Spread the love

 

 

गुणवंत विद्यार्थी, संचालक व निवृत्त शिक्षकांचा सत्कार; सभासदांना लाभांशाचे वाटप

बेळगाव : बेळगाव प्रायमरी टीचर्स सोसायटीची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा क्रमांक पाचमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोसायटीचे अध्यक्ष अरुण एस. पाटील अध्यक्षस्थानी होते.

संचालक सुनील देसुरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर अध्यक्ष अरुण एस. पाटील, व्ही. आर. संकपाळ, आर. एन. पत्तार आणि आर. बी. बाळेकुंद्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनi करण्यात आले. व्ही. आर. पाटील यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन केले, तर सचिव प्रकाश जी. पाटील यांनी इतर विषयांचे वाचन करून सभेचे कामकाज पुढे नेले.

यावेळी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सोसायटीच्या संचालक व निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी सहारा मुजावर, मोहम्मदसैफ चमनशेख, दयानंद सनदी, श्रेयस पाटील आणि चैतन्य गावडे यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

निवृत्त शिक्षक बी. सी. सावनू, आर. बी. बाळेकुंद्री, आशा खन्नूकर, एन. आय. दलवाई, जी. व्ही. कुंभार आणि एन. ए. आतार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सोसायटीचे संचालक एम. मुल्ला, व्ही. आर. संकपाळ, उत्तम पाटील, राजू कांबळे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. एम. नाईक यांनी केले, तर आर. एस. पवार यांनी आभार मानले. सभेच्या शेवटी सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *