
बेळगाव : येथील हुतात्मा चौक गणेश मंडळातील उसत्वाची मुहुर्तमेढ अध्यक्ष श्री. अशोक पोतदार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून नुकतीच पार पडली.
प्रारंभी मंडळाचे प्रेरणास्थान असलेले कै. रामकुमार जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.व अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री. पोतदार यांनी सालाबादप्रमाणे यंदाचा उत्सव देखील सर्वांच्या सहभागाने शिस्तबद्द, धार्मिक वतावरण्यात पार पाडण्यात येईल असा विस्वास व्यक्त केला.
यावेळी मंडळाचे शाम सुतार, शेखर हंडे, राजकुमार कलघटगी, महेंद्र पोरवाल, लक्ष्मीकांत जाधव, विजय मोहिते, संजय चौगुले, अमोल बेदरे, दिलीप पाटील, अशोक नाईक, अशोक कलबुर्गी, चंदू कोलकर, यश हंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार प्रदर्शन शिवाजी हंडे यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta