
कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू
कौशांबी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ११ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, संपूर्ण कारखाना अक्षरशः जमीनदोस्त झाला.
या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कौशांबीचे जिल्हाधिकारी अमित कुमार पाल यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून, कारखान्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या चार तासांपासून बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले.
घटनास्थळी आयजी, डीआयजी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत. दरम्यान, आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेची माहिती मिळावी यासाठी कुटुंबीय चिंतेत आहेत. दुर्घटनेनंतर आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta