Sunday , September 20 2026
Breaking News

मुतगे पदवीपूर्व महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात स्वागत समारंभ

Spread the love

 

मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित पदवीपूर्व महाविद्यालय, मुतगे येथे अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीच्या सदस्या श्रीमती रेखा अंची या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्राचार्य पंकज देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य एस. एस. जाधव यांनी करून दिला.

मार्च २०२६ मध्ये बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या आरती चौगुले, संस्कृती यड्डी, पूनम काकतकर आणि संजना पाटील या विद्यार्थिनींचा रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच मराठी विषयात विशेष नैपुण्य मिळविलेल्या समीक्षा पालकर आणि सानिका बेडका यांचाही सन्मान करण्यात आला. बारावीच्या मराठी विषयाचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल प्राध्यापिका ज्योती जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी अर्थशास्त्र विभागाने तयार केलेल्या “कौटुंबिक उत्पन्न आणि उपभोग सर्वेक्षण” या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी बारावी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी आणि अर्थशास्त्र विभागाने घेतलेल्या परिश्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले.

प्रमुख पाहुणे पंकज देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन शिक्षण हे व्यक्तिमत्त्व घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी संवादकौशल्य विकसित करून रोजगाराच्या विविध संधींसाठी स्वतःला तयार करावे तसेच व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष सुनील अष्टेकर, सदस्य नारायण कणबरकर, शिरीष पाटील, एम. वाय. केदार, हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. बी. कोंडस्कोप, प्राथमिक विभागाचे प्रमुख एस. आर. तिरविर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा शिर्लेकर यांनी केले, तर ज्योती जाधव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *