Sunday , September 20 2026
Breaking News

डॉ. बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : डॉ. बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयात नुकताच महाविद्यालयाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी स्वरूपा सिंग यांच्या सुंदर आवाजात वंदे मातरम राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा कर्नाटक धारवाडचे कार्याध्यक्ष श्री. इरेश बी. अचंटगेरी होते. द.भा. हिंदी प्रचार सभा धारवाड कर्नाटक शाखेचे सचिव श्री. एस राधाकृष्णन हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एन. मुगुटकर, तसेच द.भा. हिंदी प्र.सभा राजीव गांधी शिक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एम. अडकी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रवक्ता डॉ. सुमेधा पट्टण, डॉ. मनीषा नाडगौडा, स्वाती सूर्यवंशी, डॉ. शोभा रेडेकर कविता मगदूम, शरद कांबळे, प्रमोद परीट, जयश्री आडी, रणजीत पाटील यांनी देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रा. जयश्री आडी आणि प्रा. शरद कांबळे यांनी स्वागत आणि परिचय करून दिला. डॉ. सी. एन. मुगुटकर यांनी पाहुण्यांचा सन्मान करून आपले थोडक्यात वक्तव्य मांडले आज दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा शिक्षक घडवण्याचे एक महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. सचिव राधाकृष्णन यांनी आपल्या आशीर्वाचना मध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षक होणे आणि त्या जबाबदाऱ्या निभावणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. इरेश अंचटगेरी यानी द.भा. हिंदी प्रचार सभेच्या कार्याबद्दल विशेष कौतुक करून शिक्षकांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित ओळखून एक आदर्श शिक्षक बनले पाहिजे असे सांगितले. डॉ. मनीषा नाडगौडा 31 जुलैला रिटायर्ड होणार म्हणून त्यांंचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला बी एड प्रथम वर्ष आणि बीएड द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. सुमेधा पट्टण यांनी उत्तमरीत्या सूत्रसंचालन करून कार्यक्रमास रंगत आणली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सुचिता मींज आणि विद्यार्थी पप्पू रत्नाकर यांनी केले एकूणच कार्यक्रम विविधतेने नटलेला होता होता. महाविद्यालयाचे वार्षिक प्रतिवेदन रणजीत पाटील तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे पुरस्कार वितरण वाचन प्रा. कविता आणि प्रमोद सर यानी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण होते. कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यास विद्यालयाचे क्लर्क आकाश चौगुले, लायब्ररीयन परशुराम पन्हाळकर तसेच सुभाष आणि प्रकाश यांनी हातभार लावला शेवटी डॉ. मनीषा नाडगौडा यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *