Sunday , September 20 2026
Breaking News

आषाढीच्या वारीत घुमला सीमाप्रश्नाचा गजर; पांडुरंगाला पुणे विभाग समितीच्या वतीने सीमाप्रश्नी साकडे

Spread the love

 

पुणे : सीमाभागातून पुणे येथे स्थायिक झालेल्या कार्यकर्त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पांडुरंग चरणी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी साकडे घातले.

यावेळी पांडुरंगाकडे प्रार्थना करतांना कार्यकर्त्यांनी सीमाभागात मराठी माणसावर कन्नडसक्ती करून मराठी संस्कृती पुसणाऱ्या कर्नाटकी प्रशासनाला सदबुद्दी द्यावी अशी प्रार्थना केली. त्याच बरोबर 1956 पासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच विरोधी पक्षाचे नेते म्हणून उद्धव ठाकरे, शरद पवार व राज ठाकरे तसेच इतर नेत्यांनी पुढाकार घ्यावा व कर्नाटकी जोखडात अन्यायाने डांबलेल्या मराठी भाषिकांना न्याय देऊन महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

यावेळी गणपती पाटील, विनोद वीर, मारुती पाटील, कुमार पठाण, संतोष कुंभार, रवी जाधव, प्रमोद आदी खानापूर तालुका व सीमाभागातील मंडळी उपस्थित होती.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *