Sunday , September 20 2026
Breaking News

हारूगेरीजवळ भीषण अपघात; दोघांची प्रकृती गंभीर

Spread the love

 

बेळगाव : कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील कोळीगुड्ड गावाच्या हद्दीत घडली.

अथणी–गोकाक मुख्य मार्गावरील कोळीगुड्ड गावाजवळ हा अपघात झाला. हारूगेरी येथील दुचाकीस्वार या अपघातात गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक आरोप करण्यात येत आहे. हारूगेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *