Sunday , July 26 2026
Breaking News

पत्रकारितेतील योगदानाला सलाम; पत्रकार बांधवांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलराव पाटील यांचे सातवे पुण्यस्मरण

Spread the love

 

संकेश्वर (पांडुरंग पाटील) : दिवंगत पत्रकार विठ्ठलराव पाटील यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त संकेश्वर येथील पत्रकार बांधवांच्या नेतृत्वाखाली विशेष स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता रुक्मिणी गार्डन येथे संपन्न होणार आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित, जनजागृती आणि लोकप्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या विठ्ठलराव पाटील यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वस्तिक इंडस्ट्रीचे उद्योगपती शिवाजी कवळी कटीकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून हुक्केरी तालुका कन्नड साहित्य परिषद अध्यक्ष प्रकाश अवलकी, रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, संकेश्वर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्रीकांत हातनुरे, अमर नलवडे आणि संजय शिरकोळी उपस्थित राहणार आहेत.

तसेच माजी नगरसेवक सुनील पर्वतराव, अविनाश नलवडे, संतोष मुडशी, हुक्केरी तालुका इलेक्ट्रिक बोर्डाचे संचालक गजानन कळली, सुभाष कासारकर, सामाजिक कार्यकर्ते आप्पा मोरे, जयप्रकाश सावंत, पुष्पराज माने, डॉ. मंदार हावळ, डॉ. जयप्रकाश करजगी, डॉ. वैभव भिडे, डॉ. विनोद गायकवाड, अप्पू तंबद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दिवंगत विठ्ठलराव पाटील यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय योगदान, समाजातील विविध प्रश्नांवर केलेली निस्वार्थ भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांना दिलेली प्राधान्यपूर्ण वाचा यामुळे त्यांची कार्यशैली आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या पुण्यस्मरण कार्यक्रमास नागरिक, पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *