Sunday , July 26 2026
Breaking News

आयुर्वेदिक व्यावसायिकाला खंडणीची धमकी; २० लाखांची मागणी केल्याचा आरोप

Spread the love

 

बेळगाव : शहरातील रामलिंग खिंड गल्ली परिसरात राहणाऱ्या एका आयुर्वेदिक व्यावसायिकाला २० लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात तिघा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुर्गराज वैद्य (वय ५१) असे तक्रारदाराचे नाव असून ते शनिवार खुट परिसरातील ‘जनता आयुर्वेदिक औषध दुकान’चे संचालन करतात.

पोलीस तक्रारीनुसार, १९ मे रोजी रात्री लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शेट्टी हॉस्पिटलजवळ वैद्य यांची कार अडवली. त्यानंतर संशयितांनी शिवीगाळ करत त्यांच्या व्यवसायासंदर्भात धमक्या दिल्या आणि २० लाख रुपये न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेत कोणतीही शारीरिक दुखापत झाली नसली तरी या प्रकारामुळे वैद्य यांना मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर त्यांनी खडेबाजार पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंद करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास सुरू करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *