Friday , August 21 2026
Breaking News

दड्डी भागात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

Spread the love

 

दड्डी : दड्डी परिसरात वटपौर्णिमा हा सण सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सलामवाडीसह परिसरातील विविध गावांतील विवाहित महिलांनी पहाटेपासून वडाच्या झाडाजवळ एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महिलांनी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून व्रताचे विधी पार पाडले.

यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजा साहित्य, फुले, फळे, हळद-कुंकू आणि नैवेद्य अर्पण केला. वटसावित्रीची कथा श्रवण करून एकमेकींना हळद-कुंकू लावत शुभेच्छा दिल्या. गावातील मंदिर परिसर आणि वडाच्या झाडाजवळ भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

वटपौर्णिमेला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व असून, सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळविल्याच्या स्मरणार्थ हे व्रत पाळले जाते. आजही ही परंपरा श्रद्धेने जपली जात असून महिलांमध्ये या सणाबद्दल मोठी आस्था असल्याचे चित्र दड्डी परिसरात पाहायला मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

शट्टीहळ्ळीत आषाढी एकादशीनिमित्त प्राथमिक मराठी शाळेत भक्तिमय पालखी सोहळा

Spread the love  विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांनी जिंकली मने शट्टीहळ्ळी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *