Saturday , May 4 2024
Breaking News

LOCAL NEWS

भीषण अपघातात अथणी येथील दोघांचा जागीच मृत्यू

  बेळगाव : लॉरीला पाठीमागून बोलेरो गाडी आदळल्याने बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तुमकूर जिल्ह्यातील शिरा तालुक्यातील चिक्कनहळ्ळीजवळ हा अपघात झाला. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील उमेश नागप्पा आणि संतोष सुरेश अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बोलेरो चालक गंभीर जखमी झाला असून त्याला शिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

पहिल्या टप्यातील निवडणुकीची तयारी पूर्ण

  मनोज कुमार मीना; मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था बंगळूर : निवडणूक आयोगाने कर्नाटक राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या मतदानाची अंतिम तयारी पूर्ण केली आहे. मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, यावेळी राज्यात १,८३२ विशेष मतदान केंद्रांच्या स्थापनेकडे लक्ष वेधले आहे, अशी …

Read More »

“आम्ही वाचतो” उपक्रमाला चळवळीचे स्वरूप यावे; चर्चेतून उमटलेला सूर

    बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त “आम्ही वाचतो” हा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात बेळगाव आणि परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या चर्चेत ‘आम्ही वाचतो’ उपक्रमाला चळवळीचे स्वरूप यावे असा सूर उमटला. …

Read More »

“त्या” बँकेच्या महिला उपाध्यक्षांचा मानसिक छळ!

  “त्या” बँकेच्या अध्यक्षांचे कारनामे खूप खोलवर असल्याचे दिवसागणिक समोर येत आहे. नोकर भरती घोटाळा हा जरी वरवरचा असला तरी बँकेच्या अनेक व्यवहारात भ्रष्टाचाराचा आलेख अगदी चढा आहे. त्यामुळे एकंदरीत सदर सहकारी बँक अडचणीत येण्याची दाट शक्यता दिसत आहे. एकीकडे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची तपासणी सुरू असताना स्वतःच्याच संस्थेच्या एका महिला …

Read More »

बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 13 उमेदवार

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 जण रिंगणात राहिले आहेत. बेळगावची खरी लढत जरी काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर विरुद्ध भाजपचे जगदीश शेट्टर यांच्यात असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्याकडे देखील लक्ष असणार आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या आठ जणांनी सोमवारी …

Read More »

नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; बेळगावात महिला शक्तीचा एल्गार!

  बेळगाव : हुबळी येथील एका खाजगी महाविद्यालयातील तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात आंदोलने छेडण्यात येत असून, या घटनेचे पडसाद आता बेळगाव पर्यंत पसरले आहे. हुबळीत झालेल्या खून प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी बेळगावमध्ये विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले. हुबळी येथील युवतीचा खून …

Read More »

मुलानेच दिली हत्येची सुपारी; 8 आरोपींना अटक

  गदग : गदग येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून मुलासह आठ आरोपींना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी गदग नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा सुनंदा बाकळे यांचा मुलगा कार्तिकसह एकाच कुटुंबातील चौघांच्या खून प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. घटनेच्या 48 तासांत पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. या …

Read More »

नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार

  शिमोगा : हुबळीची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत शिमोगा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, नेहाच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असून आम्ही या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची …

Read More »

सार्वजनिक वाचनालयात उद्या “आम्ही वाचतो” कार्यक्रम

  बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दि. 23 एप्रिल दिवशी ‘पुस्तक दिवस’ साजरा करण्यात येत असून विद्यार्थ्यांसाठी “आम्ही वाचतो” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडे बरेचसे विद्यार्थी वाचन करतात, जाणकारीने वाचतात, त्यांना साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम आवडतात, शिवाय विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ते भरपूर वाचन करतात, त्यामुळे पुस्तक …

Read More »

काली नदीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा बुडून मृत्यू

  दांडेली : हुबळी येथील एका कुटुंबातील 6 जणांचा दांडेली तालुक्यातील अक्वाड गावाजवळील काली नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची घटना आज घडली. एकूण 8 जण हुबळीहून दांडेली येथे सहलीला आले होते. याबाबत समजलेली माहिती अशी की, दांडेली तालुक्यातील अक्वाड गावात हुबळीहून 8 जणांचे कुटुंब सहलीला आले होते. ते जेवण करून …

Read More »