Wednesday , November 29 2023
Breaking News

LOCAL NEWS

व्ही. एस. खवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

बेळगाव : कंग्राळी बी. के. येथील माध्यमिक विद्यालयाचे लिपिक व्ही. एस. खवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम. हुलगबाळी अध्यक्षस्थानी होते. विश्व भारत सेवा समितीच्या कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. के. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. …

Read More »

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे समर्पक निधी : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे समर्पक निधी आहे. बेळगाव जिल्ह्यातील पौरकार्मिक नोकर भरतीसाठी आम्ही यापूर्वीच समितीची बैठक घेतली आहे. 359 पौरकार्मिकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगावमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील पौरकार्मिकांच्या भरतीसाठी …

Read More »

जिल्हा पालक सचिव अंजुम परवेज यांनी घेतली जिल्हा प्रगती आढावा बैठक

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असल्याने शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सर्वांना रोजगार आणि नरेगा योजनेंतर्गत गुरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव डॉ. अंजुम परवेज …

Read More »

सरस्वती महिला मंडळचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : अनंतशयन गल्ली येथील सरस्वती महिला मंडळाच्या पहिल्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके उपस्थित होत्या. त्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मंडळातील सर्व महिलांनी एकत्रित येत दांडिया, गरबा, हादगा यासह अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या कथाकथन व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दिनांक 18 नोव्हेंबर रोजी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाल साहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी बालकथाकारांची निवड करण्यासाठी कथाकथन स्पर्धा व दिवंगत कवी द. रा. किल्लेकर यांच्या स्मरणार्थ सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन 9 नोव्हेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन येथे करण्यात आले …

Read More »

बिजगर्णी येथील श्री लक्ष्मी यात्रा पुढील वर्षी 16 एप्रिल रोजी

    बेळगाव : बिजगर्णी (बेळगाव) येथील श्री लक्ष्मी यात्रोत्सव 16 एप्रिल 2024 रोजी करण्यात येणार आहे. नुकताच गावातील श्री ब्रह्मलिंग देवळात ग्रामस्थ मंडळाची बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर उपस्थित होते. बिजगर्णी, कावळेवाडी अशा दोन गावांची ही लक्ष्मीची यात्रा एकत्रितपणे होणार आहे. बिजगर्णी गावातील श्री ब्रह्मलिंग …

Read More »

दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरला धजद – भाजपचे काही आमदार काँग्रेसमध्ये येतील : प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार

  बंगळूर : दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरला धजद – भाजपचे काही आमदार काँग्रेस पक्षात सामील होतील, असे स्फोटक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिल्लीत केले. दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतील. भाजप आणि धजदचे आमदार आमच्या …

Read More »

दलपतींना ‘ऑपरेशन हस्त’ची भीती; आमदारांच्या सुरक्षेसाठी रिसॉर्टमध्ये रणनीती

  बंगळूर : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या धजदला आपल्या १९ आमदारांचे संरक्षण करण्याची डोकेदुखी झाली आहे. काँग्रेस नेत्यांच्या ‘ऑपरेशन हस्त’पासून आमदारांना वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री व धजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी रणनीती आखत आहेत. हसनच्या रिसॉर्टमध्ये आपल्या आमदारांना नेऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर …

Read More »

कार कालव्यात पडून 5 जणांचा मृत्यू

  मंड्या : मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर तालुक्यातील बनघट्टाजवळ मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता मोटारचालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार (कार) कालव्यात पडली. म्हैसूरकडून मोटार येत होती. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसू नये म्हणून कार वळवली आणि ती कालव्यात पडली. चंद्रप्पा, धनंजय, कृष्णप्पा आणि जयन्ना या तिघांचे वय अंदाजे 40 …

Read More »

डी. के. शिवकुमार – सतीश जारकीहोळींची गुप्त बैठक

  राज्याच्या राजकारणात खळबळ, बेळगावच्या राजकारणात शिवकुमाराची ढवळाढवळ नाही बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली व चर्चा केली. जारकीहोळी हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. क्रिसेंट रोडवरील सतीश जारकीहोळी यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात …

Read More »