Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

ऑनलाइन फार्मसी बंद करण्याची बीडीआरपीएची सरकारकडे मागणी

  बेळगाव : सरकारने ऑनलाइन फार्मसी बंद कराव्यात या मागणीसाठी बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशन (बीडीआरपीए) तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारला निवेदन सादर करण्यात आले. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट ऑर्गनायझेशनतर्फे आज बुधवारी सरकारने ऑनलाईन फार्मसी बंद कराव्यात या मागणीसाठी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्याला पाठिंबा देणाऱ्या …

Read More »

७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी बैठक संपन्न

डी.बी. पाटील कार्यालयात नियोजन बैठक, तीन सत्रांची रूपरेषा जाहीर बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन-२०२६ येत्या २४ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या …

Read More »

धोकादायक बडेकोळ्ळमठ वळण दुरुस्तीसाठी एनएचएआयकडून 3 कोटी मंजूर

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-48) बागेवाडी घाटातील बडेकोळ्ळमठ वळण अखेर दुरुस्त होणार असून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सतत होणारे अपघात आणि नागरिकांच्या वाढत्या चिंतेनंतर ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. बेळगावपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेले हे वळण पावसाळ्यात …

Read More »

सावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा

  कोल्हापूर: देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी मागणी ‘कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ’ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.​ प्रवासी संघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष …

Read More »

मच्छे येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

  मच्छे : श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांच्या वतीने मच्छे गावातील दहावी उत्तीर्ण तसेच विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा श्री रोहन बने सर उपस्थित होते. तसेच “दहावीनंतर काय?” या …

Read More »

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा समितीचा इशारा

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवरून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. बेळगावातील मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत सीमाप्रश्न, मराठी भाषिकांवरील अन्याय आणि कन्नड संघटनांच्या हालचालींविरोधात विविध आंदोलनात्मक निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून …

Read More »

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ डॉक्टर नियुक्त करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

  बेळगाव : बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करण्याबरोबरच पॅरा-मेडिकल, नर्सिंग, रेडिओलॉजिकल सेवेसह कर्मचारी वर्गाची संख्या वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), बेळगाव जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष दुर्गेश मेत्री यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी …

Read More »

बालाजी वधू-वर केंद्राच्या मराठा वधू- वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : बालाजी वधू-वर केंद्र, बेळगाव यांच्या वतीने रविवार दि. १७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा वधू-वर मेळाव्यास वधू-वर, पालक आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्यास ५०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. शहरातील चव्हाट गल्ली जालगार मारुती मंदिर मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

बेळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवकांवर कन्नड संघटनांचा संताप; ‘कर्नाटक पर’ ठरावाला पाठिंबा नसल्याचा आरोप

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत “बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे” असा ठराव मंजूर करण्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपमधील काही मराठीभाषिक नगरसेवकांनी पाठिंबा न दिल्याचा आरोप करत विविध कन्नड संघटनांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी या संदर्भात …

Read More »

जांबोटी–कणकुंबी मार्गावर 14 हजार लिटर स्पिरिट जप्त; 35 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात जांबोटी–कणकुंबी मार्गावर अबकारी विभागाने मोठी कारवाई करत 14 हजार लिटर अवैध मद्यसार (स्पिरिट) जप्त केले. मंगळवारी (दि. 19 मे) करण्यात आलेल्या या कारवाईत 35 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अबकारी विभागाला चॉकलेट रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या सहा चाकी बँकर वाहनातून …

Read More »