Saturday , May 18 2024
Breaking News

आनंदनगर येथील नाल्याचे काम अर्धवट स्थितीत; नाल्यात ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

Spread the love

 

वडगाव : आनंद नगर मधील नाल्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून अर्धवट स्थितीत असल्यामुळे नाल्यामध्ये ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्याने, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून ड्रेनेजचे पाणी नाल्यात साचून राहिल्यामुळे डासांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पैदास वाढली आहे. याचा या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, हिवताप यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे, ड्रेनेजचे पाणी साचून राहिल्यामुळे आजूबाजूच्या विहिरीचे पाणी सुद्धा दूषित झाले आहे, त्यामुळे ऐन उन्हाळ्यातच पाण्याची समस्याया परिसरात निर्माण झाली आहे. तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ या नाल्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी येथील नागरिकांच्या कडून केली जात आहे. आनंद नगर दुसरा क्रॉस इथपर्यंत नाल्याचे काम झाले आहे. इथून पुढचे काम अर्धवट स्थितीत गेल्या दीड महिन्यापासून तसेच पडून राहिले आहे, त्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास होत आहे. सदर नाल्याचे काम तिसऱ्या क्रॉस पासून दुसऱ्या क्रॉस पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. पण तिथून पुढचे काम गेल्या दीड महिन्यापासून अर्धवट स्थितीत तेथेच पडून आहे. याचा या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा संबंधित कंत्राटदाराने या नाल्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी येथील नागरिकांच्या कडून मागणी केली जात आहे.

आमदार अभय पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज
या भागाचे आमदार अभय पाटील यांनी याकडे लक्ष देऊन, संबंधित कंत्राटदाराला वेळेत नाल्याचे काम पूर्ण करण्याची सूचना करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांच्या कडून होत आहे.

नाल्यावर स्लॅब घालण्याची गरज
आनंद नगर तिसरा क्रॉस, दुसरा क्रॉस व पहिल्या क्रॉस पासून सदर नाला हा नागरी वस्तीतून जात असल्यामुळे नाल्यावर स्लॅबची नितांत अशी गरज आहे, तेव्हा प्रशासनाने नाल्याचे काम पूर्ण करीत असताना त्याच्यावर स्लॅबही घालावा अशी येथील नागरिकांच्या कडून मागणी होत आहे. नालावर स्लॅब घातले नाही तर नाल्यामध्ये केरकचरा टाकण्यात येईल व लवकरच नाला तुडुंब भरून जाईल अशी भीती नागरिकांच्याकडून व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून पडून वॉर्डबॉयचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  बेळगाव : हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याच हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या इसमाचा सफाई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *