बेळगाव : नुकताच जनरल माणिक शॉ परेड ग्राउंड बेंगळुरू येथे झालेल्या टीसीएस वर्ल्ड 10 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत बेळगाव येथील रणजित शिवाजी कणबरकर यांनी 50 ते 54 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या वर्ल्ड ऍथलेटिक्स मान्यताप्राप्त स्पर्धेत संपूर्ण भारतातून 10,451 धावपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत रणजीत शिवाजी काणबरकर यांनी या स्पर्धेमध्ये हॅट्रिक केली आहे.
रणजीत कणबरकर हे सरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ, बेळगाव येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यांनी ही 10 किलोमीटरची शर्यत 38 मिनिटे 37 सेकंदात जिंकून बेळगाव शहराचे नाव उज्वल केले आहे. रणजीत कणबरकर यांनी यापूर्वी अदानी अहमदाबाद मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, पुणे महामॅरेथॉन, वसई विरार मनपा मॅरेथॉन इत्यादी अखिल भारतीय स्तरावर अनेक शर्यती जिंकल्या आहे. यापूर्वी त्यांनी 1993 मध्ये 5000 मीटरमध्ये अखिल भारतीय विद्यापीठ सुवर्णपदक विजेते होते. रणजीत कणबरकर हे निवृत्त लेफ्टनंट कर्नल शिवाजीराव मल्हारराव कणबरकर यांचे सुपुत्र आहेत.