Wednesday , July 15 2026
Breaking News

सोन्या-चांदीचे १८ लाखांचे दागिने जप्त; घरफोडी प्रकरणी संशयित अटकेत

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध भागांत घरफोडी व चोरीच्या घटना घडविणाऱ्या एका संशयिताला वडगाव ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल १८ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव निलेश भरमा सुतार (वय ४१) असे असून तो मूळचा भोवी गल्ली, बेळगाव येथील रहिवासी असून सध्या मंडोळी येथील संभाजी गल्ली येथे वास्तव्यास आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी भवानीनगर आणि मच्छे परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. मच्छे येथील लक्ष्मी देवलापूर यांच्या घरात तसेच गणेश ज्वेलर्समध्ये चोरी झाली होती. याशिवाय भवानीनगर परिसरातही चोरीची नोंद झाली होती. या प्रकरणांचा तपास सुरू असताना वडगाव ग्रामीण पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.
पोलिस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने संशयित निलेश सुतार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ११ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडर, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, उपनिरीक्षक संतोष दळवाई यांच्यासह सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल, अमित रूपनवर, शिवकुमार कांबळे, तांत्रिक कर्मचारी रमेश अक्की, महादेव काशीद आणि दीपक दोड्डगोणे यांच्या पथकाने केली.

About Belgaum Varta

Check Also

ऊसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श होऊन दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुधोळगी (मुडलगी) तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *