Monday , September 21 2026
Breaking News

मुस्लिम तरुणाच्या छळाला कंटाळून अल्पवयीन तरुणीची आत्महत्या?; तरुण अटकेत

Spread the love

 

अथणी : अथणी तालुक्यातील ऐगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन हिंदू तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली असून, तिच्या कुटुंबीयांनी एका मुस्लिम तरुणावर सतत छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी पीयूसीमध्ये शिक्षण घेत होती. तिची ओळख पिराज काळे या तरुणाशी झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे समोर आले आहे. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुलीचा मोबाईल फोन काढून घेतला होता.

तक्रारीनुसार, त्यानंतरही संबंधित तरुण मुलीच्या घराजवळ वारंवार येत होता आणि तिचा छळ करत होता. या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. घटनेनंतर पालकांनी ऐगली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पिराज काळे याला ताब्यात घेऊन अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ऐगली पोलीस करत आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत काही ठिकाणी ‘लव्ह जिहाद’चा संशय व्यक्त केला जात असला, तरी यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलीच्या निधनामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *