Saturday , June 6 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील विविध भागात 8 जून रोजी वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

खानापूर : तालुक्यातील विविध भागांमध्ये सोमवार, ८ जून रोजी नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे तब्बल ७ ते ८ तास वीजपुरवठा खंडित राहणार आहे. कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कोडचवाड आणि खानापूर ११० केव्ही उपकेंद्रांमध्ये तिमाही देखभाल कार्य हाती घेतले जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोडचवाड उपकेंद्र परिसरात ८ तास वीजबंदी

केपीटीसीएलच्या कोडचवाड ११० केव्ही उपकेंद्रात सर्व ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत उपकरणांची तिमाही देखभाल करण्यात येणार असल्याने सोमवार, ८ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

या काळात बसवनगर, जिकानूर, चिक्कादिनकोप्प, बीळकी, देमिनकोप्प, कारलगा, बीदरभावी, कामशिनकोप्प, कोडचवाड, कग्गनगी तसेच आसपासच्या परिसरांतील ग्राहकांना वीजपुरवठा मिळणार नाही.

खानापूर हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रवीण बरगाले यांनी नागरिकांनी आवश्यक नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

खानापूर उपकेंद्रांतर्गतही वीजपुरवठा खंडित

दरम्यान, खानापूर ११० केव्ही उपकेंद्रातही प्रथम तिमाही देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे सोमवार, ८ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

या उपकेंद्रांतर्गत लोंढा, खानापूर आणि ११० केव्ही SWR-TSS खानापूर या ३३ केव्ही फीडरवरील पुरवठा बंद राहील. तसेच लैला शुगर, देवलत्ती, गर्लगुंजी, करंबळ, लोकोळी, मोदेकोप, काटगाळी, गणेबैल, खानापूर औद्योगिक क्षेत्र, कोर्ट परिसर, हेब्बाळ, लोंढा, खानापूर आणि इतर भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

केपीटीसीएलच्या प्रशासनाने नागरिक, व्यापारी, उद्योगधंदे तसेच शेतकरी यांनी नियोजित वीजबंदीचा विचार करून आवश्यक तयारी करावी, असे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *