Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेकडे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांतर्फे रोपे सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे शिक्षक गजानन सावंत उपस्थित होते.

इयत्ता सातवीची विद्यार्थिनी ओजस्वी तानाजी गुरव हिने आपले मनोगत व्यक्त केले तर सोहम प्रताप बेळगुंदकर याने पर्यावरणासंबंधी कवितेचे वाचन केले. प्रमुख पाहुणे गजानन सावंत यांनी पर्यावरणाच्या प्रश्नांबद्दल माहिती दिली. यामध्ये झाडे लावा आणि त्यांची निगा राखा, कचरा कचरापेटीतच टाका, प्राण्यांचे संरक्षण करा, पाण्याची, विजेची बचत करा असा मोलाचा सल्ला त्यांनी आपल्या भाषणात दिला. सातवीच्या विद्यार्थ्यांनी रोप लागवडीबरोबर प्लास्टिकऐवजी स्टील बाटल्या वापरण्याचा संकल्प केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, शिक्षक वर्ग, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *