Sunday , July 26 2026
Breaking News

सावगावमध्ये मराठी शाळा वाचविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले; कन्नड शाळेसाठी स्वतंत्र जागेची मागणी

Spread the love

 

बेळगाव : सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला. यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने जमून निवेदन देण्याचे ठरले होते पण सदर घटनेबाबत वातावरण चिघळले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने बी ई ओ अधिकारी यांनी थेट सावगाव शाळेत आज दाखल झाल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना एक महिनाचा कालावधी द्या आपण कन्नड माध्यमाच्या शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करु अशी विनंती केली पण यावेळी शाळा सुधारणा समितीसह ग्रामस्थांनी जुनी शाळा आपण स्वच्छ करुन वापरण्यात यावी अशी सुचना केली आणि जुनी शाळा दुरुस्त होईस्तोवर इतर ठिकाणी भाडेतत्त्वावर खोली घेऊन शाळा चालवावी. सदर भाडे आपण भरु पण आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेत कन्नडी शाळा सुरू करु नका अशी विनंती केली. सदर विनंतीची दखल बी ई ओ यांनी घेतली असून पर्यायी जागा शोधून त्याठिकाणी शाळा भरविण्याचे मान्य केले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर सागावकर, बेळगाव क्षेत्र शिक्षणाधिकारी दान्नामा जाळकी, शिक्षण संयोजक (ECO) बडीगेर क्लस्टर प्रमुख सतीश पाटील, मुख्याध्यापक एल एस चांदीलकर, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर एम चौगुले, युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचीटणीस मनोहर हुंदरे, मोतेस बारदेसकर, अनिल हेगडे, श्रीकांत कदम, सचिन केळवेकर, बसवंत घाटेगस्ती, निंगाप्पा मोरे, परशराम आकनोजी,‌ यल्लाप्पा पाटील, दर्शन घाटेगस्ती, प्रदिप मोरे, योगेश आकनोजी, महेश कदम, निकिता पाटील, रेखा घाटेगस्ती, अनिता बसरीकट्टी,
सुजाता काकतकर, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *