बंगळुरू : बसच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचे डोके खिडकीत अडकून बसल्याने गोंधळ उडाल्याचा प्रकार आज बंगळुरूमध्ये घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बंगळूरमध्ये राज्य परिवहनच्या बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेने बसच्या लहान खिडकीतून खिडकीबाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या खिडकीतून बाहेर डोकावताना महिलेचं डोकं खिडकीत अर्ध्यावरच अडकून राहिल्याने बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले!खिडकीबाहेर थुंकण्यासाठी आपण डोकं बाहेर काढलं असं या महिलेने सांगितलं. मात्र खिडकीत डोकं अडकल्यामुळे बसचालक, बसवाहक आणि इतर प्रवाशांचा मात्र अर्धा तासाहून अधिक काळ गोंधळ उडाला. शेवटी अथक प्रयत्नातून महिलेचं डोकं सुरक्षितपणे खिडकीतून सोडविण्यात आलं आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला. बंगळुरूमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे हसावं कि रडावं असा प्रश्न निर्माण झाला आणि या साऱ्या घटनेचा व्हिडीओ मात्र नेहमीप्रमाणेच वायरल देखील झाला..