Sunday , July 26 2026
Breaking News

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची दमदार सुरुवात; पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Spread the love

 

बंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करून आपल्या कारभाराची दमदार सुरुवात केली आहे.

राज्यात तीन वर्षांनंतर नेतृत्व बदल झाले असून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शिक्षण, रोजगार आणि युवक सक्षमीकरणाला प्राधान्य देणाऱ्या विविध योजनांना मंजुरी देण्यात आली.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात येणार असून त्यासाठी परिवहन विभागाकडे केवळ एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. तसेच मागील सरकारने दिलेल्या ६५ हजार सरकारी नोकऱ्यांच्या आश्वासनाची पूर्तता निश्चित कालमर्यादेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील युवकांसाठी खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन रोजगार पोर्टल सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय युवकांमध्ये सामाजिक सहभाग आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने राज्यभरात १० हजार ‘भारत जोडो संघ’ युवक क्लब स्थापन करण्यात येणार आहेत.

घरबांधणी क्षेत्रालाही दिलासा देताना भू-गॅरंटी योजनेअंतर्गत २,५०० चौरस फूट जागेवर बांधण्यात आलेल्या तीन मजली घरांसाठी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्याच बैठकीत घेतलेल्या या निर्णयांमुळे विद्यार्थी, युवक आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात या निर्णयांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रश्नपत्रिका फुटीला लगाम; ७० हजार पदांच्या भरतीसाठी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’

Spread the love  भरती परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक; जिल्हाधिकाऱ्यांना समन्वयाच्या सक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *