Sunday , September 20 2026
Breaking News

दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंटला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Spread the love

 

 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात असलेल्या एका हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागून किमान 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवीय नगर येथील ‘लेमन ग्रीन’ रेस्टॉरंटमध्ये मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत संपूर्ण इमारतीला वेढले. धुराचे प्रचंड लोट आणि वाढत्या ज्वाळांमुळे इमारतीत अडकलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याने काही नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी थेट बाल्कनी आणि खिडक्यांमधून उड्या मारल्या. त्यामुळे अनेक जण जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली अग्निशमन दलाला सकाळी सुमारे 9.10 वाजता आगीची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अनेक अग्निशमन बंब आणि पाण्याच्या टाक्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तळघरासह विविध भागांत अडकलेल्या नागरिकांची सुटका केली.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, राजधानीत वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे इमारतींमधील अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *