Sunday , July 26 2026
Breaking News

कोर्ट परिसर आहे की दारूचा अड्डा; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?

Spread the love

 

बेळगाव : न्यायदानाचे पवित्र केंद्र मानल्या जाणाऱ्या कोर्ट परिसरातच मद्यपान करून बाटल्या इतरत्र टाकल्याचे चित्र समोर आले आहे.

कोर्ट परिसरात येणारे पक्षकार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना अशा प्रकारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी मद्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि इतर कचरा आढळून येत असल्याने परिसराच्या स्वच्छतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, विविध शासकीय कार्यालये आणि सुरक्षा यंत्रणांच्या उपस्थितीतच हा प्रकार सुरू असल्याने “दिव्याखाली अंधार” अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. न्यायालय परिसरासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा घटना घडत असतील तर सामान्य भागातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती काय असेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिक आणि वकिलांकडून कोर्ट परिसरात नियमित गस्त वाढविणे, सीसीटीव्ही देखरेख मजबूत करणे आणि मद्यपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आता या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करतील का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *