Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

साहित्यसेवेचा आधारवड डॉ. शरद गोरे यांची ७ व्या बेळगाव साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार

  ३२ वर्षांत १९६ संमेलनांचा विक्रम, हजारो नवोदितांना घडवले बेळगाव : मराठी साहित्याच्या क्षितिजावर अखंड तेवणारा तारा, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद मधुकर गोरे येत्या २४ मे २०२६ रोजी होणाऱ्या ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाला सन्मानीय उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत, अशी …

Read More »

कर्करोगाने त्रस्त ज्येष्ठ डॉक्टरची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

बेळगाव : कर्करोगाने त्रस्त असलेल्या एका ज्येष्ठ डॉक्टरने शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बेळगाव शहरात खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरांचे नाव डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ (वय ७९) असे असून ते मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्याचे होते. अनेक वर्षे वैद्यकीय सेवा …

Read More »

बंगळुर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला ‘टेल स्ट्राइक’ १८१ प्रवासी सुरक्षित

  बंगळूर : एअर इंडियाच्या दिल्ली-बंगळुर उड्डाणादरम्यान गुरुवारी सकाळी गंभीर प्रकार घडला. दिल्लीहून बंगळुरकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय २६५१ या विमानाला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना ‘टेल स्ट्राइक’चा सामना करावा लागला. विमानात एकूण १८१ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या …

Read More »

शांताई विद्या आधारतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची मदत

  बेळगाव : शांताई विद्या आधारच्या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्याच्या उदात्त उपक्रमांतर्गत शांताई वृद्धाश्रमातील 4 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी मदत वितरित करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. गरजू पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक भाराशिवाय त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करण्याच्या आपल्या संस्थेच्या दीर्घकालीन कार्याला पुढे नेत ॲलन विजय मोरे यांनी गरजू चार …

Read More »

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गो-हत्त्या रोखण्याची श्रीराम सेनेची मागणी

बेळगाव : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात यावेत तसेच गो-हत्त्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्रीराम सेना बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष रविकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना कोकितकर यांनी सांगितले की, 28 …

Read More »

नीट रद्द करून राज्यांना परीक्षा घेण्याचा अधिकार द्या

  नीट घोटाळ्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन; पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी बंगळूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज बंगळुरात मोठे आंदोलन छेडले. युवक काँग्रेसच्या वतीने फ्रीडम पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात मुख्यमंत्री सिध्दरामय्या, काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह …

Read More »

महात्मा फुले यांच्या तृतीय रत्न नाटकाचे विश्लेषण

  जागर विवेकाचा कार्यक्रमात अनिल आजगावकर यांचे व्याख्यान बेळगांव : राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या प्रेरणेने व प्रगतिशील लेखक संघ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बेळगांव शाखा यांच्यातर्फे बुधवारी झालेल्या जागर विवेकाचा कार्यक्रमात कॉ. अनिल आजगावकर यांचे महात्मा फुलेंचे नाटक तृतीय रत्न यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार …

Read More »

जागतिक मधमाशी दिनानिमित्त ग्रामस्थांना शेड नेट, साखर, प्लेट्सचे वाटप

  बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम सखी यांच्या वतीने २० मे रोजी जागतिक मधमाशी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आर आर फार्म बेनकनहळी येथे ग्रामस्थांना शेड नेट, साखर प्लेट्सचे वाटप करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यात मधमाशांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, शेती उत्पादन वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. याबाबत जनजागृती …

Read More »

समितीचे ज्येष्ठ नेते अर्जुनराव नागोजी गोरल यांचे निधन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी जिल्हा परीषद सदस्य श्री. अर्जुनराव नागोजी गोरल( वय 77) वर्षे यांचे शोचनीय निधन गुरुवार दिनांक 21-5-2026 रोजी दुपारी 2-30 वा. झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कर्ते चिरंजीव, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी उद्या शुक्रवार तारीख 22 रोजी सकाळी 10:00 वाजता …

Read More »

बेळगावात रविवारी “संगीत आशा”

    बेळगाव : स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सदाबहार’ गाण्यांवरं आधारित ‘संगीत आशा’ हा मराठी व हिंदी गीतांचा, कार्यक्रम रविवार दि. २४ सायंकाळी ५ वाजता लोकमान्य रंगमंदिरात आयोजित केला आहे. प्रा. दत्ता नाडगौडा, विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटी व मराठी भाषाप्रेमी मंडळातर्फे सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती …

Read More »