Saturday , November 7 2026
Breaking News

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या कायापालटासाठी २१५ कोटी मंजूर; भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधांचा विकास

Spread the love

 

बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणूका यल्लम्मा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने तब्बल २१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या महत्त्वाकांक्षी विकासकामांच्या भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

आमदार विश्वास वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामध्ये भव्य क्यू कॉम्प्लेक्स, सर्व सुविधांनी युक्त अन्नदान भवन, नवीन प्रशासकीय कार्यालय आणि वॉकर्स झोन यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

एकूण मंजूर निधीपैकी १८० कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित ३५ कोटी रुपयांच्या कामांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे यल्लम्मा डोंगरावर येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास आणि दर्शन व्यवस्था अधिक सुकर होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मंदिराच्या गाभाऱ्यात पावसाळ्यात शिरणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, सध्याच्या दुकानदारांना प्राधान्य देत त्यांना लिलाव प्रक्रियेद्वारे नव्या जागा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या विकास प्रकल्पामुळे श्री क्षेत्र यल्लम्मा परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून, धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *