Sunday , July 26 2026
Breaking News

धक्कादायक! एसडीआरएफचे सीपीआय श्रीशैल चौगुले यांची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) सीपीआय श्रीशैल चौगुले (वय ३७) यांनी गुरुवारी बेळगावातील चन्नम्मा नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बराच वेळ चौगुले हे खोलीतून बाहेर न आल्याने त्यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी तातडीने एसडीआरएफच्या जवानांना याची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी खोलीचा दरवाजा तोडून चौगुले यांना बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बिम्स रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *