Monday , September 21 2026
Breaking News

जयनगर-हुंचेनहट्टी परिसरात तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या; बेळगाव हादरले

Spread the love

 

बेळगाव : जयनगर-हुंचेनहट्टी परिसरात बुधवारी सायंकाळी एका 23 वर्षीय तरुणाची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

राहुल तिप्पाण्णा तळवार (रा. तानाजी गल्ली, मजगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शहरातील एका औषध दुकानात काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे 5.15 वाजण्याच्या दरम्यान राहुलला रामेश्वरनगर परिसरात बोलावण्यात आले होते. यावेळी काही जणांसोबत आर्थिक व्यवहारावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच आरोपींनी राहुलवर तलवारीने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या राहुलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, डीसीपी नारायण बरमणी तसेच एसीपी गंगाधर बी. एम. यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते.

या हल्ल्यात आठ ते दहा जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, राहुलच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार असून त्याच्या निधनामुळे मजगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *