Sunday , July 26 2026
Breaking News

हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचा गुरुवारी अंतिम सामना

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित दिवंगत नगराध्यक्ष डी. व्ही. पाटील स्मृती चषक व निकु पाटील मित्र परिवारा तर्फे अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी (ता.२७) निपाणीतील स्पोर्ट्स विरुद्ध महादेव स्पोर्ट्स यांच्यात सामना झाला. त्यामध्ये महादेव स्पोर्ट्स क्लबने चार गडी गमावून ४० धावा जमवल्या. द्रोण स्पोर्ट ने २ गडी गमावून ३६ धावा केल्या. बोरगाव येथील मेजर स्पोर्ट्स क्लबने ३ गडी गमावून ७६ धावा केल्या. त्यानंतर द्रोण स्पोर्ट्स ने दोन गडी गमावून ४२धावा केल्या. टाकळी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध हिंडलगा स्पोर्ट्स क्लब मध्ये झालेल्या स्पर्धेत हिंडलगा क्लबने विजय मिळवला. यावेळी दुर्गा स्पोर्ट्स क्लबने अंतिम फेरी गाठली. गुरुवारी निपाणी द्रोण स्पोर्ट्स विरुद्ध परमने ट्रेडर्स, कुरली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कोगनोळी स्पोर्ट्स यांच्यात अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याचे टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसापासून सुरू असणाऱ्या पाच षटकाच्या फुल स्पीच क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या दिवशी बुधवारी पाचगाव (ता. करवीर) येथील परमणे ट्रेडर्स संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. रविवारपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी बुधवार अखेर तीन दिवसात एकूण ३२ सहभागी संघापैकी २४ सामने खेळविण्यात आले. दरम्यान या स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीतील (फायनल) सामने गुरुवारी (ता.२८ ) होणार आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी पहिला सामना कोडणी विरुद्ध खडकलाट संघात झाला. यामध्ये कोडणी संघाने पाच षटकात चार गडी बाद ६९ धावा पिटल्या. प्रतीउतरादाखल खेळताना खडकलाट संघाने चार गडी बाद करून अवघ्या ३३ धावा केल्याने हा सामना कोडणी संघाने जिंकला. तर दुसरा सामना कोथळी विरुद्ध आळवे या संघात झाला. यामध्ये कोथळी संघाने दोन गडी बाद करीत ७३ धावसंख्या पटकावली, प्रत्युत्तरादाखल खेळताना आळने संघाने पाच गडी बाद करीत ४५ धावा केल्या.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *