Sunday , September 20 2026
Breaking News

जागतिक मधमाशी दिनानिमित्त ग्रामस्थांना शेड नेट, साखर, प्लेट्सचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम सखी यांच्या वतीने २० मे रोजी जागतिक मधमाशी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आर आर फार्म बेनकनहळी येथे ग्रामस्थांना शेड नेट, साखर प्लेट्सचे वाटप करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यात मधमाशांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, शेती उत्पादन वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मधमाशांचे पर्यावरणातील योगदान, परागीभवन प्रक्रियेमधील त्यांची भूमिका तसेच जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मधमाशांचे संरक्षण किती आवश्यक आहे याविषयी माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकरी व ग्रामस्थांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नेतृत्व ग्रुपच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी केले. यावेळी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, शितल पाटील, स्वाती फडके, शीतल नेसरीकर, अर्चना कंग्राळकर तसेच सखी ग्रुपच्या अन्य सदस्यांची उपस्थिती होती.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *