Sunday , July 26 2026
Breaking News

लोकप्रतिनिधी, आयुक्तांच्या गलथान कारभारामुळेच घरकुल प्रश्नी गोंधळ

Spread the love

 

बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; रक्कम भरलेल्यांना घरकुल मिळणारच

निपाणी (वार्ता) : राजीव गांधी घरकुल आणि प्रधानमंत्री आवास योजनेत येथील १८१२ लाभार्थ्यांची यादी आहे. ही यादी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने राजकारण विरहित केली आहे. पण लोकप्रतिनिधींच्या अट्टाहासामुळे लाभार्थींना घरकुलापासून दूर राहावे लागले आहे. शिवाय घरकुल ड्रॉ मध्ये गोंधळ हे त्यांनीच घातला आहे. त्यामुळे हा ड्रॉ पुढे ढकलण्यात आला असून योग्य लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करून त्यानुसार दुरुस्तीनंतर योग्य लाभार्थींना घरकुल दिले जाणार आहे. लोकप्रतिनिधी,‌ आयुक्तांच्या गलथान कारभारामुळेच घरकुल प्रश्नी गोंधळ उडाल्याची माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामधामात गुरुवारी (ता.२१) आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
चिंगळे म्हणाले, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून १.५० लाख तर राज्य सरकारकडून १.८० लाख रुपये देण्यात येतात. त्याशिवाय शासनाकडून कर्जाची व्यवस्था ही केली आहे. घरकुल वाटपामध्ये श्रेय घेऊ नये. १६ मार्चपर्यंत अनेक लाभार्थी रक्कम भरली आहे. याशिवाय अद्याप काहींचे हप्ते थांबले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देऊन मुदत वाढविण्यात आली आहे. अशा लोकांचीही नावे ड्रॉ पद्धतीत समाविष्ट केली जावीत. त्यानंतर स्कूटनी करून योग्य लाभार्थींना घरे घेण्यात यावेत. लोकप्रतिनिधींच्या मनमानी कारभारामुळे लाभार्थ्यांच्या घरकुलाचा गोंधळ उडाला आहे. त्याचे खापर मात्र आपल्यावर फोडले जात आहे.
लेखी पत्र देऊन घरकुल लाभार्थ्यांची यादी मागितली असतानाही ती दिलेली नाही. याशिवाय अश्रय कमिटी, तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांची बैठक न घेताच परस्पर यादी बनवली आहे. आपल्या कार्यकर्त्यांची केवळ ६५ नावे या यादीत घेतली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबियांवर अन्याय झाला आहे.
लोकप्रतिनिधी, आयुक्तांच्या गलथान कारभारामुळेच लाभार्थ्यांना घरकुला पासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे योग्य लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी आपण सतत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
बैठकीस चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, अस्लम शिकलगार, दीपक ढनाल, बसवराज पाटील, किरण कोकरे, ॲड. संजय चव्हाण, झाकीर कादरी, प्रमोद पाटील, दीपक सावंत, अरुण आवळेकर, किरण पाटोळे, अमोल बन्ने, युवराज पोळ, जावेद कोल्हापूरे, रवींद्र श्रीखंडे, संजय कांबळे, वर्षा चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *