Sunday , September 20 2026
Breaking News

अंतर्गत सुरक्षा, गुप्तचर विभागात निवड झाल्याने निकिता कांबळे हिचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : ममदापूर येथील निकिता अनिल कांबळे हिची अंतर्गत सुरक्षा व गुप्तचर विभागात निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार सोहळा पार पडला झाला. या सोहळ्यास सहकार रत्न उत्तम पाटील यांनी उपस्थित राहून निकिताचा सत्कार केला.
अमोल आवटे यांनी‌ स्वागत केले. उत्तम पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या पदांवर झेप घेणे ही अभिमानाची बाब आहे. निकिता हिने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश युवक-युवतींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
यावेळी महारुद्र स्वामी, निरंजन पाटील (सरकार), इंगळे गुरुजी, प्रकाश पाटील, गजानन कावडकर, दत्तात्रय देवर्डे, भास्कर स्वामी, विकास चौगुले, रावसाहेब गोरवाडे, महादेव मादळे, अमित शिंदे, संभाजी नेजे, मधुकर उत्तुरे, उत्तम पाटील, शेखर पाटील, सुखदेव आवटे, संतोष पाटील, प्रकाश एस. पाटील, डॉ. सुहास पाटील, शरद कदम, राजेंद्र आवटे, संभाजी पाटील, संभाजी हरेल, आण्णासाहेब पाटील, अरुण चौगुले उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *