Sunday , July 26 2026
Breaking News

बकरी ईदनिमित्त निपाणी बकरी बाजार तेजीत

Spread the love

 

महागाई, इंधन दरवाढीमुळे किमतीत ‘उसळी’

निपाणी (वार्ता) : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘बकरी ईद’ आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने शहरात विविध प्रकारच्यातयारीला वेग आला असून, कुर्बानीसाठी बोकडांना मागणी वाढली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे वाढलेले इंधन दर आणि एकूणच महागाईचा फटका यंदा बकरी बाजाराला बसला आहे. परिणामी बकरी, बोकडांच्या दरात वाढ झाली असून बाजार चांगलाच तेजीत आला आहे.
शहरात गुरुवारच्या मुख्य बाजारासह विविध भागांत दैनंदिन बोकड बाजार भरत आहे. विविध प्रजातीचे बोकड खरेदी विक्रीसाठी नागरिक गर्दी केली होती. परंतु आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन दिवसांत दोनदा वाढ झाली आहे. परराज्यातून येणाऱ्या वाहतुकीचा खर्च वाढल्याने बोकड, बकरी महागले आहेत. बोकडांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात बोकडांची आवक सध्या कमी आहे.
निपाणीच्या बकरी बाजारात ग्राहकांसाठी स्थानिक ग्रामीण भागासह परराज्यातूनही व्यापारी दाखल झाले होते. मुरगुड, कागल, इचलकरंजी, रायबाग शहर निपाणी ग्रामीण भागातील बकरी आणि बोकडांची झाली होती. पुढील ३ ते ४ दिवसांत ग्राहकांची मागणी आणि गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *