Monday , September 21 2026
Breaking News

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन

Spread the love

 

बेळगाव : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून बुधवारी बाजारपेठ परिसरात व्यापक पथसंचलन काढण्यात आले.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पथसंचलनात पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

खडेबाजार, किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली आदी प्रमुख मार्गांवरून हे पथसंचलन पार पडले. सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना शांतता, संयम आणि सहिष्णुता राखण्याचे आवाहन केले. “बकरी ईदसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. सर्व धार्मिक समाजांचा सन्मान राखून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे,” असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *