खानापूर : खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेचा आज बक्षिस वितरण समारंभ शिवस्मारक चौक येथे पार पडला. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती मखर सजावट स्पर्धेला तालुक्यातील प्रत्येक भागातून उदंड प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेमध्ये 70 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी 10 …
Read More »LOCAL NEWS
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलची विद्यार्थिनी अक्षरा गुरव हिने 49 किलो ग्रॅम वजन गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला निवड झाली आहे. तसेच वेदांत कुगजी याने तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड …
Read More »वि. गो. साठे गुरुजींच्या विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
बेळगाव : मराठा मंडळ व सेंट्रल हायस्कूलचे मराठीचे प्रसिद्ध शिक्षक श्री. वि. गो. साठे गुरुजींच्या सर्व विद्यार्थ्यांचा मेळावा शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी मराठी विद्यानिकेतनच्या प्रांगणात संपन्न झाला. या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला साठे गुरुजींचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्याचे स्वागत श्री. सुभाष ओऊळकर तर प्रास्ताविक श्री. मालोजी …
Read More »सन्मित्र सोसायटी आयोजित चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : सन्मित्र मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येळ्ळूर यांच्यावतीने रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर स्पर्धेत एकूण 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा गव्हर्नमेंट मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन: 145 किमी मानवी साखळी
मूलभूत हक्कांचे संरक्षण म्हणजेच लोकशाही : मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : विविधतेत एकसंध असलेल्या आपल्या देशाच्या वैविध्यपूर्ण भावना अभिव्यक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करणे, त्याच्या मूल्यांना प्रोत्साहन देणे हाच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मुळ उद्देश असल्याचे प्रतिपादन बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोलताना केले सुवर्ण विधानसभा येथे आज रविवारी …
Read More »30 वर्षापासून अडथळा असलेला विद्युत खांब हटवला!
बेळगाव : येळ्ळूर येथील कलमेश्वर मंदिरानजीक असलेल्या विजेचा खांब अखेर हटविल्याने मोठ्या वाहनांना होणारा अडथळा दूर झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. येळ्ळूर येथील कलमेश्वर मंदिराजवळ एक विद्युत खांब मागील 25 ते 30 वर्षे होता. सध्या कलमेश्वर मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनिकरणाचे काम चालू आहे. सदर खांबाच्या विद्युत भरीत तारा …
Read More »बोरगाव इंदिरा कॅन्टीनच्या कामाची नगरसेवक, अधिकाऱ्याकडून पाहणी
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि कामगार वर्गाला अल्पदरात नाष्टा व जेवन मिळावे, यासाठी बोरगाव येथे इंदिरा कॅन्टीन उभारण्यात येत आहे. या इंदिरा कॅन्टीनचे काम सुरू आहे. नगरपंचायत अधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी या कामाची पाहणी केली. राज्यात काँग्रेस सत्ता आल्यानंतर ‘हसिवूमुक्त कर्नाटक’ या योजनेतून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इंदिरा …
Read More »“त्या” बँकेचे जुने शेअर होल्डर “कोमात”तर नवे शेअर होल्डर “जोमात”
शहरातील बसवान गल्ली येथील मxxxठा बँकेच्या अध्यक्षांनी आपल्या भ्रष्टाचाराचे कारनामे लपविण्याकरिता तसेच भविष्यात बँकेवर आपला सुलतानी कारभार चालविण्याकरिता आपल्या नात्या-गोत्यातील व बँकेची तीळमात्र व्यवहार नसलेल्या लोकांना सभासद करून घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर कोणत्याही संचालकांना ही बाब समजू शकली नाही काय? “त्या” बँकेचे ‘अ’ वर्ग सभासद संख्या 12808 इतकी …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन आयोजित उत्कृष्ट गणेश मूर्ती व देखावा स्पर्धेचा निकाल जाहीर
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन आयोजित उत्कृष्ट गणेश मूर्ती व देखावा स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ दरवर्षी प्रमाणे जायंटस् ग्रुपऑफ बेलगाम मेनच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही उत्कृष्ठ मुर्ती आणि देखावा स्पर्धा दक्षिण आणि उत्तर भागात घेण्यात आल्या त्याचा निकाल खालील प्रमाणे आहे. …
Read More »भाजप आमदार मुनीरत्न यांना कोलार येथे अटक
दोन एफआयआर दाखल; छळ, लाच, जातीवाचक शिवीगाळचा आरोप बंगळूर : कंत्राटदाराच्या जीवाला धोका आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार मुनीरत्न नायडू यांना शनिवारी कोलार येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप आमदार मुनीरत्न यांनी आपल्या जीवाला धोका निर्माण केला, जातिवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार चलुवराजू या ठेकेदाराने पोलिसांत केली …
Read More »