Friday , April 17 2026
Breaking News

बेळगाव महापालिका स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या चारही स्थायी समितीची निवडणूक आज मंगळवारी बिनविरोध पार पडली असून निवड झालेल्या सदस्यांची नावांची घोषणा करण्यात आली आहे.

सदर बिनविरोध निवडीद्वारे स्थायी समित्यांमध्ये प्रत्येकी सत्ताधारी गटाच्या 5 आणि विरोधी गटाच्या 2 सदस्य नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे.

आरोग्य स्थायी समिती

श्रीशैल कांबळे, रूपा चिक्कलदिनी, दिपाली टोपगी, राजू भातकांडे, माधवी राघोचे, अस्मिता पाटील, लक्ष्मी लोकरी.

सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती

अभिजीत जवळकर, संतोष पेडणेकर, रविराज सांबरेकर, जयतीर्थ सौंदत्ती, उदय उपरी, बसवराज मोदगेकर, शिवाजी मंडोळकर.

अर्थ स्थायी समिती

मंगेश पवार, सारिका पाटील, शंकर पाटील, प्रिया सातगौडा, रेशमा कामकर, रेश्मा भैरकदार, शकीला मुल्ला.

अर्थ आणि कर स्थायी समिती

नेत्रावती भागवत, पूजा पाटील, नितीन जाधव, ब्रम्हानंद मिरजकर, हनुमंत कोंगली, इक्रा मुल्ला, जरीना फत्तेखान.

यांची सत्ताधारी गटाच्या वतीने दक्षिण आमदार आणि माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांची निवड केली. तर विरोधी गटातर्फे आमदार असिफ शेठ यांनी आपल्या सदस्यांची नावे निश्चित केली.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *