Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

शहर समिती अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग; निष्ठावंत नेतृत्वाची मागणी

  बेळगाव : दीपक दळवी यांच्या निधनानंतर मध्यवर्ती तसेच शहर समितीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. दरम्यान, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची नुकतीच सर्वानुमते निवड झाली आहे. मात्र शहर समितीचे अध्यक्षपद अद्याप रिक्त असून, या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे. समितीच्या राजकारणात शहर समितीच्या अध्यक्षपदाला विशेष …

Read More »

खादरवाडी “बक्कापाची वारी” 180 एकर जमीन वाचवली

  बेळगाव : खादरवाडी गावातील ‘बक्कापाची वारी’ या जमिनीचा विषय 180 एकर जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित होता, ज्यावर साडेतीन वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर गावकऱ्यांनी विजय मिळवला आहे. 180 एकर जमीन बेकायदेशीररित्या विकण्याचे आणि त्यावर अतिक्रमण करण्याचे प्रयत्न सुरु होते. सातबारा उताऱ्यातून वगळण्यात आलेला “खादरवाडी गावचे शेतकरी सामायिक वहिवाटदार” हा उल्लेख …

Read More »

अवैध दारू – मावा विक्री प्रकरणी दोघांना अटक; कॅम्प व खडेबाजार परिसरात छापे मुद्देमाल जप्त

  बेळगाव : शहरातील कॅम्प आणि खडेबाजार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी अवैध दारू व मावा विक्रीवर धडक कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे. कॅम्प परिसरात पीएसआय रुक्मिणी ए. आणि त्यांच्या पथकाने असदखान दर्ग्याजवळ छापा टाकून गणेशपुर येथील पप्पू राजाराम कुदळे याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे १० लिटर अवैध दारू …

Read More »

पूर्व वैमनस्यातून अमन नगर येथे तिघांवर तलवारीने हल्ला

  बेळगाव : अमननगर परिसरात पूर्व वैमनस्यातून तिघांवर तलवारीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, तिघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात वली शेख, इमाम शेख आणि मजीद शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. …

Read More »

राजकीय गोंधळ थांबवण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलवा; सतीश जारकीहोळींची मागणी

  बंगळूर : कर्नाटकातील राजकीय गोंधळावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तातडीने दिल्लीला बोलवून चर्चा करावी, अशी मागणी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. मंगळवारी बंगळुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनीही याच मुद्द्यावर अलीकडे भाष्य केले होते. “हा गोंधळ किती दिवस चालणार? लवकर …

Read More »

गृहनिर्माण मंत्र्यांच्या नातेवाईकाकडूनच १.१३ कोटींच्या सोन्याची चोरी; दोघांना अटक

  बंगळूर : शिवाजीनगर पोलिसांनी गृहनिर्माण मंत्री बी. झेड्. जमीर अहमह खान यांच्या पुलकेशी नगर येथील निवासस्थानातून सुमारे १.१३ कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे अमीर अहमद आणि त्याचा व्यावसायिक भागीदार सयद अमीर अशी आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी …

Read More »

येळ्ळूर परिसराला वादळी वाऱ्यामुळे झाड आणि खांब कोसळून विस्कळीत झालेली वाहतूक अडीच तासानंतर पूर्ववत

  येळ्ळूर : मंगळवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे येळ्ळूर परिसरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठे झाड आणि विजेचे खांब मुख्य रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेत काही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश …

Read More »

उन्हाच्या तडाख्यात बेळगावकरांना ‘कुलिंग शेड’चा दिलासा

  राणी चन्नम्मा चौकात जिल्हा प्रशासनाकडून सावलीची सोय बेळगाव : सिग्नलवर उभे राहून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राणी चन्नम्मा चौकात उभारलेले ‘कुलिंग शेड’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्येही नागरिकांना थोडासा थंडावा देणारा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि महापालिका आयुक्त …

Read More »

ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून बैलहोंगल तालुक्यात बालकाचा मृत्यू

  बैलहोंगल : ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसून प्रवास करत असलेल्या बालकाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील मास्तमर्डी गावात घडली. ट्रॅक्टरला नांगर जोडून नेत असताना इंजिनवर बसलेला मनोज बसवराज मिचिडोळी (वय 13 वर्षे) हा लहान मुलगा अचानक तोल जाऊन ट्रॅक्टरखाली पडला. त्यानंतर तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

सामाजिक आणि धार्मिक सलोख्यासाठी सहकार्य करा : पोलीस आयुक्त बोरसे यांचे आवाहन

  बेळगाव : समाजाच्या हितासाठी, जातीय सलोखा वाढवण्यासाठी आणि सोशल मीडियाचा गैरवापर, अमली पदार्थांचे सेवन, जुगार व किरकोळ गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणां विरोधात जनजागृती करण्यासाठी पोलीस आणि नागरी प्रशासनासोबत मिळून काम करा असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना केले. अल्पसंख्याकांसाठी पंतप्रधानांच्या १५-कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या जिल्हा …

Read More »