Wednesday , August 26 2026
Breaking News

गृहनिर्माण मंत्र्यांच्या नातेवाईकाकडूनच १.१३ कोटींच्या सोन्याची चोरी; दोघांना अटक

Spread the love

 

बंगळूर : शिवाजीनगर पोलिसांनी गृहनिर्माण मंत्री बी. झेड्. जमीर अहमह खान यांच्या पुलकेशी नगर येथील निवासस्थानातून सुमारे १.१३ कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे अमीर अहमद आणि त्याचा व्यावसायिक भागीदार सयद अमीर अशी आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आमीर अहमद हा मंत्र्यांच्या कुटुंबाला परिचित असून, मंत्र्यांच्या आई सोगर खानम यांचा दूरचा नातेवाईक आहे. सोगर खानम यांनीच या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
आरोपी आमीर अहमद हा घरात वारंवार ये-जा करून मदत करण्याच्या बहाण्याने कुटुंबाचा विश्वास संपादन करत होता. त्याच्या ट्रॅव्हल व्यवसायात तोट्यामुळे तो आर्थिक अडचणीत होता. त्याने यापूर्वी कुटुंबाकडे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मागितली होती, तसेच मक्का येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मदत न मिळाल्याने त्याने साथीदार सय्यद आमीर याच्यासोबत चोरीचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरी केल्यानंतर दोघांनी दागिने एका खासगी फायनान्स कंपनीत तारण ठेवून पैसे उभे केले. त्यानंतर हा पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
चोरीनंतर आमीर अहमद अचानक घरात येणे बंद झाले आणि त्याचा मोबाईलही बंद असल्याने संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्याचा माग काढून अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे चोरीला गेलेले दागिने जप्त केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटकातील बनावट औषधांचे देशभरात जाळे

Spread the love अनेक राज्यांपर्यंत विस्ताराची शक्यता बंगळूर : तावरेकेरे येथील दोड्डेरी परिसरात उघडकीस आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *