Wednesday , August 26 2026
Breaking News

येळ्ळूर परिसराला वादळी वाऱ्यामुळे झाड आणि खांब कोसळून विस्कळीत झालेली वाहतूक अडीच तासानंतर पूर्ववत

Spread the love

 

येळ्ळूर : मंगळवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे येळ्ळूर परिसरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठे झाड आणि विजेचे खांब मुख्य रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेत काही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी हेस्कॉमशी संपर्क साधला, हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी व परिसरातील तरुण युवा कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मिळून अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करत रस्त्यावर पडलेले झाड आणि तुटलेले खांब बाजूला केले.

माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, हेस्कॉमचे सदा साबण्णावर, स्थानिक नागरिक मधु कुगजी, सतीश कुगजी, प्रशांत कुगजी, गणू कुगजी, बजरंग घाडी, बाळू लोहार, हेमंत पाटील, शाम येळ्ळूरकर, ग्राम पंचायत कर्मचारी उदय हुंदरे, विनोद हट्टीकर, महादेव मुरकुटे, गावातील नागरिक आणि हेस्कॉमच्या पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तब्बल अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

तुरमुरीत मटक्याचा डाव उधळला; बुकिला बेड्या

Spread the love  तलावानजीक मटका नंबर घेण्याचा उद्योग; ग्रामीण पोलिसांचा छापा, रोकड व चिठ्ठ्या जप्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *