बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अथणी तालुक्यातील कटगेरी येथील सरकारी शाळेची विद्यार्थिनी प्रार्थना नागप्पा बिरादार हिने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. यंदाच्या निकालातही मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अथणीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या प्रार्थनाने …
Read More »LOCAL NEWS
कर्नाटकातील कोडगूमध्ये विदेशी महिलेवर अत्याचार
दोन आरोपी अटकेत; अमेरिकेतील दूतावासाकडून दखल बंगळूर : अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील एका महिलेवर कोडगू जिल्ह्यातील विराजपेट विधानसभा मतदारसंघातील कुट्टा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या होमस्टेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी झारखंडमधील वृजेश कुमार आणि घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून होमस्टे मालक विशाल यांना पोलिसांनी अटक केली …
Read More »दहावी परीक्षेचा आज निकाल; तृतीय भाषेला यंदा गुण मिळणार
बंगळूर : अनेक गोंधळांच्या पार्श्वभूमीवर लाखो विद्यार्थी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील दहावी (एसएसएलसी) परीक्षेचा निकाल उद्या (ता. २३) जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी बुधवारी दिली. उद्या दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर विभागाच्या अधिकृत …
Read More »उद्या दुपारी जाहीर होणार एसएसएलसीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेची कमाल!
बेळगाव : आताच आमच्या लोकप्रिय सोशल मेडियाला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि. २२ एप्रिल २०२६ कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने इयत्ता दहावी (SSLC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता निकाल घोषित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल …
Read More »शिवजयंती मिरवणुकीत शिवभक्तांसाठी पाण्याचे वाटप; गोगटे मिलकडून स्तुत्य उपक्रम
बेळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणुकीच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असताना, हजारो शिवभक्तांसाठी एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना दिलासा मिळावा यासाठी गोगटे मिलचे प्रमुख श्री. गोगटे सर यांनी मोठ्या उदार मनाने हजारो पाण्याच्या बाटल्यांचे प्रायोजन करून त्याचे वितरण केले. या …
Read More »युवा सेना बेळगावतर्फे चित्ररथ मिरवणुकीदरम्यान शीतपेय वाटपाचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : श्री शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा सेना बेळगावतर्फे चित्ररथ मिरवणुकीदरम्यान शीतपेय वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ताकाच्या स्वरूपात करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हजारी शिवभक्तांना दिलासा मिळाला. बेळगावची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सलग अनेक तास चालत असल्याने मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शिवभक्तांसह विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांना उष्णतेचा त्रास होतो. याच …
Read More »स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत
बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर अवस्थेत सुटका करत सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्परता आणि मानवतेचे उदाहरण घालून दिले. सदर व्यक्ती न्यायालय परिसरात अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या पायाला तीव्र संसर्ग झाला असून स्थिती झपाट्याने बिघडत असल्याचे दिसून आले. याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांकडून राकसकोप जलाशयाची पाहणी; पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन
बेळगाव : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शहरासमोर पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी पाहणी करून उपलब्ध पाण्यासाठ्याचा आढावा घेतला. शहराला प्रामुख्याने राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो.सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापर वाढत असताना भविष्यातील गरज …
Read More »परमेश्वर यांच्यावर बेटिंग प्रकरणी एफआयआर; न्यायालयाचा आदेश
बंगळूर : राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना बेटिंग प्रकरणामुळे अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ४२व्या एसीजेएम न्यायालयाचे न्यायाधीश के. एम. शिवकुमार यांनी तुमकूर येथील कोडिगेहळ्ळी पोलीस ठाण्याला एफआयआर नोंदवून चौकशी करण्याचे निर्देश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये तुमकूर …
Read More »बंगळुरमध्ये हॉटेलला भीषण आग, जीवितहानी टळली
बंगळूर : बंगळुरमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली असून, नुकतेच सुरू करण्यात आलेले ‘शुद्ध तिंडी’ हे हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले आहे. नाइस रोडलगत सोम्पुरा सर्कलजवळ असलेल्या या हॉटेलमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने विक्राळ रूप धारण केले आणि संपूर्ण हॉटेल आगीत भस्मसात झाले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta