Wednesday , August 26 2026
Breaking News

ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून बैलहोंगल तालुक्यात बालकाचा मृत्यू

Spread the love

 

बैलहोंगल : ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसून प्रवास करत असलेल्या बालकाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील मास्तमर्डी गावात घडली.

ट्रॅक्टरला नांगर जोडून नेत असताना इंजिनवर बसलेला मनोज बसवराज मिचिडोळी (वय 13 वर्षे) हा लहान मुलगा अचानक तोल जाऊन ट्रॅक्टरखाली पडला. त्यानंतर तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची नोंद नेसरगी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरपासून फ्लायओव्हरच्या कामाला मुहूर्त; वाहतूक कोंडीला मिळणार ‘ब्रेक’!

Spread the love  निविदा प्रक्रिया पूर्ण; काम सुरू करण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी – प्रमुख मार्गांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *