Thursday , August 27 2026
Breaking News

पूर्व वैमनस्यातून अमन नगर येथे तिघांवर तलवारीने हल्ला

Spread the love

 

बेळगाव : अमननगर परिसरात पूर्व वैमनस्यातून तिघांवर तलवारीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, तिघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या हल्ल्यात वली शेख, इमाम शेख आणि मजीद शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

जखमी तरुण आणि हल्लेखोर यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे समोर आले आहे. या वैमनस्यातून काही जणांनी तलवारीसह येत तिघांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर माळमारुती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने संत मीरा शाळेला क्रीडा साहित्य भेट

Spread the love    बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *