Monday , September 21 2026
Breaking News

पोलिसांच्या भीतीने कृष्णा नदी ओलांडताना बोट उलटली; ६ जण बुडाले

Spread the love

 

देवरहिप्परगी : विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील बळोती जॅकवेलजवळील कृष्णा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कृष्णा नदीकाठी एक टोळके जुगार खेळत होते. याचा सुगावा लागताच पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या भीतीने टोळक्याने लागलीच नदीत असलेल्या बोटीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जोरदार वाऱ्यामुळे बोट उलटली आणि त्यामध्ये सहा जण बुडाले तर दोन जण पोहत किनाऱ्यावर पोचले.
कोल्हार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहांचा शोध घेतला, सध्याच्या माहितीनुसार दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इतर मृतदेहांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच एसपी ऋषिकेश सोनेवणे, एएसपी शंकर मारिहाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *