Monday , September 21 2026
Breaking News

कर्करोगाने त्रस्त ज्येष्ठ डॉक्टरची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

Spread the love

बेळगाव : कर्करोगाने त्रस्त असलेल्या एका ज्येष्ठ डॉक्टरने शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बेळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

मृत डॉक्टरांचे नाव डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ (वय ७९) असे असून ते मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्याचे होते. अनेक वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर ते बेळगावमध्ये स्थायिक झाले होते. साधेपणा आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांची समाजात विशेष ओळख होती.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भटकळ यांनी आपल्या घराच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारी तातडीने घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

प्राथमिक तपासात आजारपण आणि मानसिक नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टिळकवाडी पोलीस ठाणे येथील पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *